बंगळूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे धक्कादायक विधान

Update: 2021-12-18 11:51 GMT

बेळगाव  : बंगळूरच्या सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर शिवप्रेमींकडून समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर त्यातच आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji maharaj) पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे. तर असा छोट्या गोष्टींसाठी दगडफेक करणे चुकीचे आहे, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या ( CM Basavraj Bomayya) यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. संपुर्ण देशासाठी प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर समाजकंटकांविरोधात कारवाई करण्याऐवजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

बंगळूर येथील सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर महाराष्ट्रासह सीमाभागात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असे विधान केले आहे. तर शांतता भंग करणारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

Tags:    

Similar News