कोरोना लसीसाठी सामान्य जनता रांगेत पण मंत्र्यांना घरी जाऊ लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्ममध्ये जाऊन लस घेतली असताना त्यांच्या पक्षाच्या एका मंत्र्यांनी मात्र कोरोना लसीकरणामध्ये सरकारची कोंडी केली आहे.

Update: 2021-03-02 14:58 GMT

देशभरात कोरोनावरील लसीकरण सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांना लस दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. पण पहिल्या दोन दिवसात लसीकरणाच्या नियोजनातील गोंधळ समोर आला आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना तासनतास ताटकळत थांबावे लागत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये मात्र एका मंत्र्यांना घरी जाऊन लस देण्यात आली आहे. कर्नाटकचे कृषीमंत्री बी.सी पाटील यांनी घऱीच लस घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याची केंद्रीय आरोग्य विभागाने तातडीने गंभीर दखल घेतली असून अहवाल मागवला आहे.

बी सी पाटील यांनी आपला लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. पाटील यांनी तालुका अधिकाऱ्यांना घरीच बोलावून घेतले आणि स्वत: त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घरीच कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले.

पण पाटील यांनी कोरोना लसीकरणाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सांगत कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी लसीकरणासाठी गेलेल्या डॉक्टरांवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त द हिंदूने दिले आहे. पण त्यांनी मंत्री महोदयांवर कारवाईबाबत काहीही सांगितलेले नाही.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन लस घेतली तर दुसरीकडे मात्र त्यांच्य़ाच पक्षाच्या मंत्र्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना घरी बोलावून लस घेतल्याने सरकारची आणि पक्षाचीही कोंडी झाली आहे.

Tags:    

Similar News