कोरोनाशी लढा - ब्रिटनसह जगासाठी आनंदाची बातमी !

Update: 2020-04-13 02:54 GMT

कोरोनाची लागण झाल्याने प्रकृती गंभीर झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन अखेर मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. जॉन्सन यांना सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोनच तासात जॉन्सन यांनी देशाला उद्देशून एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे.

आपण लवकरात लवकर कामाला सुरूवात करणार आहोत असं त्यांनी या व्हिडिओमधून सांगितले आहे. जॉन्सन यांच्यावर ICUमध्ये तीन दिवस उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. तिथे ३ दिवस उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटातून ब्रिटन लवकरच बाहेर पडेल असा संदेशही त्यांनी जनतेला दिला आहे. पण सध्या तरी त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला असल्याने परराष्ट्रमं६ डॉमिनीक राब हे प्रभारी पंतप्रधान म्हणून सर्व कामकाज पाहणार आहेत.

Similar News