जेएनयू प्रशासनाची काही विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रार

Update: 2020-04-05 01:37 GMT

विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणारे दिल्लीतील जेएनयू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी सरकारनं जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या नियमांचे काही विद्यार्थ्यांनी उल्लंघन केले असल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

प्रशासनानं दाखल केलेल्या FIRमध्ये १ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या आवारात काही विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांशी असभ्य वर्तन केले तसंच लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करत गर्दीदेखील केली असा आरोप करण्यात आला आहे. अशाप्रकारची कृती करुन या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठानं दिला आहे.

Similar News