...तर कंगनाविरोधात अटक वॉरंट ?

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुसानीच्या फौजदारी खटल्यावर आज अंधेरी कोर्टाने वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौत उपस्थितीवरुन जोरदार संताप व्यक्त केला. शेवटची संधी देत पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढू असा सज्जड दम आता कोर्टानं भरला आहे.

Update: 2021-09-14 09:42 GMT

गतवर्षी कोविड काळात वादग्रस्त विधानं केल्यानं कंगना चर्चेत आली होती. अनेक ठिकाणी तिच्या विरोधात खटले सुरु आहेत. मागील आठवड्यात जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेत अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगनाची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. कारवाई सुरू करण्याचा महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश बेकायदा नाही, त्यात अनियमितता नाही. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला होता.

यापुर्वी वारंवार सुनावणीसाठी हजर होणं टाळलेल्या कंगनाने यावेळी कोरोनाचा आधार घेतला. कंगनाला करोनाची लक्षणं आढळली असून कोविड चाचणी झाली आहे. रिपोर्ट अजून आलेला नाही अशी माहिती तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी दिले. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांच्याकडून आक्षेप नोंदवून गेल्यावेळीदेखील कंगना पुढील सुनावणीस उपस्थित राहील सांगत गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती असं सांगितलं.

यानंतर सिद्दीकी यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं असल्याची माहिती कोर्टाला दिली. हाच डॉक्टर साक्षीदार असून कंगनाने चित्रपट प्रमोशनच्या वेळी अनेक लोकांची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. भारद्वाज यांनी यावेळी सुनावणीला उशीर होत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होणार आहे.

Tags:    

Similar News