जरांगे आज नवी मुंबईत धडकणार, एपीएमसी मार्केट बंद ; अवजड वाहनांना बंदी

Update: 2024-01-25 06:24 GMT

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीवरून लाखोंच्या संख्येने पायी मुंबईला निघाले आहेत त्यांचा आजचा मुक्काम हा नवी मुंबईत म्हणजेच मुंबईच्या हद्दीवर असणार आहे या पार्श्वभूमीवर वाशी येथील एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. जरांगेचा आजचा मुक्काम हा वाशी येथील एपीएमसी मार्केट मध्ये असणार आहे

मराठा मोर्चा दरम्यान सायन पनवेल महामार्गावरील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मोर्चाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ३ हजार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी खबरदारी पोलिसांनी घेतली असल्याचं नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News