वाळू माफियांचा अंबडच्या तहसीलदारावर जीवेघेणा हल्ला

राज्यात वाळू माफियांची दहशत आजही कायम आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज वाळू माफियांनी अंबडच्या तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तहसीलदार हे थोडक्यात बचावले असून, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Update: 2023-02-23 09:22 GMT

जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विदयाचरण जगन्नाथ कडवकर हे अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या तहसील कार्यालयातील कक्षात शेतीच्या सुणावणीचे अर्धन्यायीक कामकाजाच्या अनुषंगाने आपल्या अँटी चेंबरमध्ये संबंधीत कामकाज पाहत असताना तहसिलदार कक्षासमोर असलेल्या शिपाई विकास डोळसे व जीवन म्हस्के यांनी पंकज सोळुंके रा.गोंदी यांस थांबण्याचे सांगीतले असता तो न थाबंता तहसीलदार यांच्या अँटी चेंबरमध्ये आला व " तु माझा फोन का उचलत नाही, तु काल आमचे गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळु साठा का जप्त केला? तसेच गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल का केला म्हणुन शिवीगाळ करु लागला.

त्याचा अवतार पाहता तो हल्ला करेल असे वाटल्याने तहसीलदार कक्षात आले. तिथेही तो त्यांच्या मागेच आल्याने तहसीलदार कक्षाचे बाहेर पडले व कोरीडोर मध्ये आले. तिथून ते पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अंबड यांना फोन लावत असतानाच, तु कोणाला फोन लावला, तु माझा फेरफार का मंजुर केला नाही असे म्हणुन दोन वेळा त्याने तहसीलदार यांच्या कानाखाली गालावर चापट मारल्या व खांदयावर ही मारले. हे घडत असताना कार्यालयीन शिपाई व इतर लोकांनी त्याल पकडले. एका व्यक्तीने त्याला ओढत बाहेर काढले. तेव्हा त्याने मोठं मोठ्याने शिवीगाळ करत मी तुला पाहुन घेतो असे म्हणुन तहसीलदार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व बाहेर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत बसुन तो पसार झाला.

अंबडचे तहसीलदार यांनी केलेल्या गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळु जप्तीच्या कारवाई, गोंदी पोलीस ठाणे येथे संभाजी खराद यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा व त्याचा फेरफार मंजुर न केल्याचा मनात राग धरुन पंकज सखाराम सोळुंके रा. गोंदी याने तहसीलदार कार्यालयात येवुन मला शिवीगाळ करुन, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. चापट बुक्याने मारहाण करुन आमच्या शासकीय अर्धेन्यायीक कामकाजात अडथळा निर्माण केला.

सदर घटना तहसील कार्यालय अंबड च्या CCTV मध्ये रेकॉर्ड झाली असून, अशा प्रकारची तक्रार तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली असून, भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३५३, ३३२, ३२३, ३५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटना स्थळावरील CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Tags:    

Similar News