मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांचं दहशतवादी कनेक्शन

Update: 2021-02-28 06:39 GMT

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ही कार उभी होती. त्यानंतर पोलिस आणि श्वानपथकाने या गाडीतून मोठ्या प्रमाणात जिलेटिनचा साठा हस्तगत केला होता.

आता या सर्व प्रकरणाची जबाबदारी Jaish-Ul-Hind या संघटनेने स्विकारली असल्याचं एबीपी या वृत्तसंस्थेने दिलेल्ला वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान या स्फोटकासोबत एक चिठ्ठी आढळली असून यामध्ये "नीता भाभी आणि मुकेश भैय्या ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या." असं या चिठ्ठीत म्हटलं आहे.

Tags:    

Similar News