भैय्यु महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी तिघे दोषी

भैय्यु महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आत्महत्तेला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं आहे.त्यांना ३०६ नुसार दोषी ठरवण्यात आलयं. भैय्यु महाराज यांनी २०१८ मध्ये स्वत:च्या परवानधारक रिव्हॉलव्हरमधुन गोळी झाडत आत्महत्या केली होती.

Update: 2022-01-28 15:46 GMT

गेल्या अनेक वर्षांपासुन भैय्यु महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायलयात सुनावणी सुरु होती. अखेर इंदोर न्यायालयाने भैय्यु महाराजांचा मुख्य सेवक विनायक, केअर टेकर पलक आणि चालक शरदला दोषी ठरवलं आहे. या तिघांनीही भैय्यु महाराजांना आत्महत्या करायला भाग पाडलं असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.भैय्यू महाराजांनी इंदोरमधील राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली होती.

कौटुंबिक कलह किंवा नैराश्य या दोन कारणांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष म्हणजे आत्महत्येपुर्वी काही महिने आधीच त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातुन आपण निवृत्त होत आहोत असे जाहीर केले होते.याप्रकरणात ३ जणांना अटक केली होती,त्य़ात एका तरुणीचाही समावेश होता. तसेच भैय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये उकळले, असा आरोप झाला होता.व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.देशभरातील विविध राज्यांमधील राजकीय नेते व चित्रपट अभिनेते भय्यू महाराज यांचे अनुयायी होते.

Tags:    

Similar News