दिलासादायक- कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

Update: 2020-06-18 02:44 GMT

देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ६ हजार ९२२ रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तर आतापर्यंत १ लाख ८६ हजारांहून जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आता रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ५२.८० टक्क्यांवर गेले आहे. दरम्यान दररोज ३ लाख रुग्णांच्या चाचण्या करण्याची क्षमता झाली आहे अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे. तर गेल्या २४ तासात देशात १ लाख ६३ हजार १८७ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या तीन महिन्यात देशात ६० लाख ८४ हजार २५६ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ६७४ सरकारी आणि खासगी २५० अशा ९२४ लॅबमध्ये सध्या तपासणी करण्यात येत आहे.

Similar News