१२ मेपासून रेल्वे सुरू होणार; 'या' १५ मार्गांवर धावणार

Update: 2020-05-10 17:56 GMT

लॉकडाऊनमुळे तब्बल दीड महिना बंद असलेली रेल्वे १२ मे पासून सुरू होत आहे. केवळ १५ निवडक मार्गांवर रेल्वेच्या काही फेऱ्या सुरू केल्या जाणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

रेल्वेने काढलेल्या परिपत्रकानुसार नवी दिल्ली-दिब्रूगड, हावडा, अगरतळा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतमपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या स्थानकांदरम्यान १५ गाड्या ये-जा स्वरूपात म्हणजे ३० फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

या गाड्यांसाठी ११ मे रोजी ४ वाजेनंतर तिकीट आरक्षण केवळ ऑनलाइन पद्धतीने केलं जाईल. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क परिधान करणं बंधनकारक असेल. याशिवाय आरोग्यासंबंधी सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे.

यानंतर आणखी नवीन मार्गांवर विशेष सेवा देण्याचा रेल्वे विचार करत आहे. सध्या राज्यांच्या विनंतीनुसार अनेक मार्गांवर 'श्रमिक स्पेशल' ट्रेन सुरू आहेत.

Similar News