भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे – अभिजीत बॅनर्जी

Update: 2019-10-15 05:47 GMT

अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिजीत हे भारतीय वंशाचे अमेरिका येथे वास्तव्यास असणारे अर्थतज्ञ आहेत. नोबेल पुरस्कृत बॅनर्जी यांनी भारताच्या आर्थिक स्थितीबाबत खूप मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हिच परिस्थिती कायम राहिल्यास भारताची परिस्थिती लवकर सुधारेल याची आशा खूप कमी आहे. असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. गेल्या 5 ते 6 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात प्रगती झाली होती. मात्र, आता ती आशा ही कमी झालेली आहे. असं ते म्हणाले.

अभिजित बॅनर्जी यांच्या सोबत एस्थर डुफ्लो आणि मायकल क्रेमर यांनाही गरिबी निर्मूलनासाठीच्या संशोधनासाठी नोबेल परितोषिक मिळाले आहे.

गेल्या 20 वर्षां पासून मी संशोधन करत आहे. गरिबी निर्मूलनासाठी योग्य उपाय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी प्रतिक्रिया अभिजित यांनी नोबेल पुरस्कार मिळाल्य़ानंतर दिली आहे.

Similar News