ज्येष्ठ वकील रामजेठमलानी यांचं निधन

Update: 2019-09-08 04:02 GMT

ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचं आज निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. गेल्या आठवड्यापासून ती अधिकच गंभीर झाली होती. आज संध्याकाळी दिल्लीतल्या लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

राम जेठमलानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या आणि वादग्रस्त खटले लढवले आहेत. इंदिरा गांधी खून खटला, हर्षद मेहता घोटाळा, २-जी घोटाळा, चारा घोटाळा, सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस, जेसिका लाल खून खटला अशा खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. लालकृष्ण अडवाणी, अमित शाह, जयललिता, वाय एस जगनमोहन रेड्डी अशा नेत्यांची त्यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Similar News