शिंजो अबे यांच्या हत्येनंतर देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर शुक्रवारी झालेल्या गोळीबारात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त करत देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

Update: 2022-07-09 04:43 GMT

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची शुक्रवारी नारा शहरात भाषण करत असताना हत्या करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शिंजो अबे यांच्या निधनानंतर ट्वीट करून म्हटले होते की, माझ्या प्रिय मित्रांपैकी एक असलेल्या शिंजो अबे यांच्या निधनामुळे मला धक्का बसला आहे. भारत व जपान यांच्यातील संबंधांना धोरणात्मक आणि भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो अबे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे जपानी जनतेच्या दुःखात संपुर्ण भारत देश सहभागी होणार आहे. तसेच देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे दिल्लीतील लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे. तर शनिवारी देशात एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News