कोरोना काळात भारतात फक्त १७,५०० व्हेंटिलेटर्स होते – नितीन गडकरी

Update: 2023-09-29 10:25 GMT

आपल्या बेधडक, रोखठोक भूमिकेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ओळखलं जातं. वाशिम इथं एका महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात गडकरींनी कोरोना काळातल्या परिस्थितीवर भाष्य केलं.

कोरोना काळात लोकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत होती. त्यावेळी काय करावं हे सूचत नव्हतं. त्यामुळं हवाई दलाच्या विमानात रिकामे ट्रक घातले आणि विशाखापट्टणम्, भुवनेश्वर या ठिकाणावरून ऑक्सिजन मागवले. १० दिवसात १०० ट्रक ऑक्सिजन विमानातून मागवले आणि ते विदर्भासह मराठवाड्यातही पाठवले. त्याकाळात मी विदर्भात ५०० व्हेंटिलेटर्स पाठवल्याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितली. याशिवाय अत्यंत किफायतशीर दरात व्हेंटिलेटर्सही तयार करून घेतल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरेतसंदर्भात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती, असंही गडकरी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी त्यावेळी गडकरींना सांगितलं की,” १२० कोटी लोकांसाठी फक्त १७ हजार ५०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत”. त्यानंतरच मग ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स वर अधिक लक्ष द्यायला सुरूवात केली, आणि कोरोनात लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतल्याचं गडकरींनी सांगितलं.

Tags:    

Similar News