सीमेवर तणाव - अखेर चीनची नरमाईची भाषा

Update: 2020-06-02 03:51 GMT

लडाखमध्ये सीमेवर भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेला तणाव अजूनही कायम आहे. पण सुरूवातीला आक्रमक भूमिका घेतलेल्या चीनने आता नरमाईची भाषा करत चर्चेतून या वादावर तोडगा निघू शकतो असे म्हटले आहे. भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे.

डिप्लोमेटिक आणि लष्करी पातळीवर चर्चेच्या माध्यमातून या वादावर तोडगा काढला जाऊ शकतो, असे चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. लडाखमध्ये सीमेच्या जवळ भारताच्या हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला चीनने आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर यावेळी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्षही झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांनी सीमेवर लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन दरम्यान मध्यस्थीची तयारी दाखवली होती.

Similar News