नगर जिल्ह्यातील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Update: 2020-08-12 02:25 GMT

राज्याचे मृदू आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघातून त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निडणूक लढवली होती. तसंच ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

गडाख यांनी निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे शंकरराव हे पुत्र आहेत. गडाख यांच्या रुपाने आता नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे बोलले जाते आहे. “शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील”

असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे‌ माजी आमदार अनिल राठोड यांचे नुकतेच निधन झाल्याने नगर जिल्हयात‌ शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण आता शंकरराव गडाख यांच्या रुपाने शिवसेनेना नगर जिल्ह्यात चेहरा मिळाला आहे.

Similar News