देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या वर

Update: 2020-06-24 06:22 GMT

देशभरात गेल्या चोवीस तासात कोरेनाचे 15 हजार 968 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांमध्ये 468 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या चार लाख 56 हजार 183 झाली आहे.

तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या देशातील एकूण रुग्णांची संख्या 14 हजार 476 एवढी झालेली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 58 हजार 685 एवढी झालेली आहे. एक लाख 83 हजार बावीस रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान देशभरामध्ये आता रुग्णांचं कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 56.38 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेली आहे.

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे दर एक लाख लोकसंख्येमागे एक टक्का एवढे कमी असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील ही आकडेवारी खूपच कमी असल्याचे देखील जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

 

Similar News