खान्देशातील पांढर सोनं अतिवृष्टीने काळवंडले

Update: 2021-09-30 09:03 GMT

जळगाव – उत्तर महाराष्ट्रात पांढर सोनं म्हणून प्रसिद्ध असलेल्या कापासचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. वेचणीला आलेला कापूस गुलाब चक्रीवादळच्या पावसाने शेतातच ओला झाला आहे. सततच्या पावसाने काढलेला कापूस घरात ठेवता येत नाही आणि वळवताही येत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकरी बेजार झाला आहे, पूर्वहंगामी कापसाचा सर्वाधिक नुकसान झालं आहे.



 


शेतात पाणी साचल्याने कपाशीचे बोंड काळवंडले आहेत. कपाशीही काळवडली आहे. शेतातील बोंड झाडावरच कुजली आहेत. तर वेचणीला आलेल्या कापसातील सरकीला कोंब फुटले आहेत. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही स्थिती आहे.



 


Tags:    

Similar News