अभ्यास करुनच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Update: 2022-05-06 12:07 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री बंगल्यावर हनुमान चालिसा म्हणारच, असं म्हणणाऱ्या राणा दाम्प्त्याला अटक झाली होती. त्यांच्यावर १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावली होती.आता त्यांची सुटका झाली. जामीन मंजूर करताना न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं. मात्र न्यायालयाच्या टिप्पणीनंतरही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्या भूमिका स्पष्ट केली आहे.

राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही,' असं महत्त्वूर्ण निरीक्षण नोंदवत कोर्टाने राज्य सरकारला झापलं.अर्जदारांनी (राणा दाम्पत्य) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेली वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह होती. राज्यघटनेप्रमाणे असलेल्या भाषा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मर्यादा अर्जदारांनी ओलांडली यात वाद नाही. मात्र, त्यांची वक्तव्ये ही कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याच्या किंवा सरकारविरोधात चिथावणी देऊन हिंसा घडवण्याच्या उद्देशाने होती, असे दिसत नाही." असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपल्या १७ पानी निकालात नोंदवले.

त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले,"सरकारने पोलिसांचा गैरवार करुनराणा दापम्त्यावर राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केला, असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहे. यावर आपलं काय मतं आहे, असं गृहमंत्र्यांना विचारताच गृहमंत्री म्हणाले, "टिप्पणी करणं हा न्यायालयाचा अधिकार आहे. पण पोलिसांनी अभ्यास करुनच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पण याबाबतचा न्यायालयीन निर्णय आल्यानंतर मी अधिक भाष्य करेन"असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Tags:    

Similar News