मुंबई गोवा महामार्ग ठप्प चिपळूण वाशिष्टी नदीवरील पुल गेला वाहून.

Update: 2021-07-23 08:32 GMT

कोकणात सतत दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहर जलमय झालं आहे. त्यामुळे सर्वत्र मोठ नुकसान झाल आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील महत्त्वाचं पूल असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा काही भाग वाहून गेला आहे.

पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून पुलाच्या मधला भाग वाहून गेला आहे त्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिपळूणाती एन्रॉन पूल सुध्दा खचल्याने दुसरा कोणताही पर्याय नसल्याने महामार्ग बंध झाला आहे.

दोन दिवस या पुलावरून सातत्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. ब्रिटिशकालीन पूल असल्याने कमकूवत झाला होता. बाजूला नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती. आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला परंतु पहाटेच्या सुमाराला या पुलाचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे पुलाला भगदाड पडल आहे . मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाच्या दुरूस्तीला आता किती काळ लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी आता पुन्हा ठप्प होणार आहे.

Tags:    

Similar News