कल्याण शहर पाण्याखाली

उल्हास नदीच्या पूरामुळे कल्याण , शहर आंबिवली , टिटवाळा आदी परिसरात पाणीच पाणी

Update: 2021-07-22 06:28 GMT

गेल्या 48 तासापासून कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. परंतु आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून पावसाने उसंती घेतली आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी कल्याणच्या उल्हास नदीच्या खोऱ्यातून उगम वालधुनी नदीचे पाणी अद्याप कमी झालेले नाही. या परिसरात नदी किनारी अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. नदीचे पाणी हे नदी पात्रापासून अर्धा किलोमीटर पर्यंत पसरले आहे. अर्धा किलोमीटर जलमय झाल्याने या नदी लागत असलेल्या अनेक घरे पाण्याखाली गेली गेले आहे या परिसरातून जाणाऱ्या रस्तेही जन्म झाल्याने अनेक रस्त्यावरती जाण्याचे व्हा आणि गावाचा संपर्कही तुटला आहे या रस्त्यावरच आठ ते दहा फूट पाणी असलेली अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या आहेत. काही ठिकाणी ट्रक देखील फसले आहेत. 24 तास उलटून ही पाणी कमी न झाल्याने गाडीत फसलेल्या लोकांना उपाशी राहावे लागले आहे.

कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेतील रेतीबंदर परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे रात्री २:०० च्या सुमारास तात्काळ तबेले मालकांनी आपल्या तबल्यातील म्हशी रस्त्यावर आणल्या असून किमान १००० ते १२०० म्हशी काढण्यात आल्या आहेत. अचानक खाडीतील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कचौरे कोळीवाडा येथील सागरदेवी मंदिर व शेड १० फुट पाण्याखाली गेले आहे. बारावी डॅम्प ची पातळी पूर्ण भरली नसुन अफवांवर विश्वास करू नका अशी माहिती आहे

बसलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

धोक्याची पातळी १७.५० मिटर आहे तर आता या नदीची पाणी पातळी १७.८० मीटर आहे.

सखल भाग पाण्यात गेला असून रेल्वे ट्रकवर पाणी आहे.

Tags:    

Similar News