पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, आधी मंत्रीपदावरून हकालपट्टी मग थेट अटक

Update: 2022-05-24 13:29 GMT

 स्वच्छ प्रशासनाचा नारा देत पंजाबमध्ये सत्ता स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाचे नेते आणि आरोग्यमंत्री असलेल्या विजय सिंगला भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजय सिंगला यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली आहे. तर त्यानंतर काही वेळातच आरोग्यमंत्री असलेल्या सिंगला यांना अटक करण्यात आली.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांची मंत्रींमंडळातून हकालपट्टी केली आहे. तर त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने विजय सिंगला यांना अटक केली आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पंजाबच्या आरोग्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर दोन महिन्यातच विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्यांच्याविरोधात ठोस पुरावे आढळून न आल्याने त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. मात्र आता आरोग्यमंत्री असलेल्या सिंगला यांच्यावर 1 टक्का कमिशन घेत असल्याचा ठोस पुरावा मिळाल्याने त्यांची थेट मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात आली, असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्वीट करून सांगितले आहे.

भगवंत मान यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आम आदमी पक्षाचा जन्म ईमानदार व्यवस्था देण्यासाठी झाला आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी नेहमी सांगितले आहे की, भ्रष्टाचाराच्या आरोपात आपला असो वा परका कठोर कारवाई केली जाईल. तसेच कोणालाही यातून सुट दिली जाणार नाही. याबरोबरच आरोग्यमंत्र्यांविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानेच त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली. त्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंजाबमध्ये पहिल्यांदाच आपल्याच मंत्र्याविरोधात कारवाई

पंजाबमध्ये पहिल्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यावर कारवाई केली आहे, अशा प्रकारे पंजाबमध्ये पहिल्यांदाच कावाई केली आहे. तर निवडणूकीत पंजाबमध्ये काँग्रेस विरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टार्गेट केले होते. मात्र आता पंजाब सरकारला आपल्याच मंत्र्याविरोधात कारवाई करण्याची नामुष्की ओढावली आहे.

Similar News