हाथरस 'सामूहिक बलात्कार': कोण काय म्हणतंय?

Update: 2020-09-30 06:13 GMT

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची जीभ कापण्यात आल्याची संतापजनक घडली आहे. या तरुणीवर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूनंतर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिचा मृतदेह गावी आणला. मात्र, गावकरी आणि पीडित कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी रातोरात या पीडितेवर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्कार कुटुंबीयांच्या परवानगीनेच केल्याचा दावा पोलिस अधिकारी करत आहे. तर दुसरीकडे पीडितेचे कटूंब पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा. यासाठी विनंती करत होते. मात्र, पोलिसांना याकडे दुर्लक्ष केलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेनंतर समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 14 सप्टेंबर सदर तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. तरुणीच्या कुटुंबाने तक्रार दाखल करुनही 10 दिवस आरोपींना अटक केली गेली नव्हती. या तरुणीवर गावातीलच चार उच्च जातीतील लोकांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. या चारही आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे.

पीडितेच्या वडीलांच्या म्हणण्यानुसार “आम्हाला घरात बंद करुन ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी पोलीस डेड बॉडी घेऊन आले. आम्हाला कळलं ही नाही नक्की कुणाची बॉडी आहे. घराचे दरवाजे बंद करुन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस उभे होते.”

मुलीच्या भावाने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत

“माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा. यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.

या सर्व घडामोडी घडत असताना विरोधी पक्षाकडून, दलित संघटनांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये 'भारत की बेटी' वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जातंय आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय, असं म्हणत राहुल गांधीं यांनी अंत्यसंस्काराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

तर कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करत, योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “रात्री २.३० वाजता कुटुंबीय विनंती करत होते, पण उत्तर प्रदेश प्रशासनाने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. जेव्हा ती जिवंत होती. तेव्हा तिला सरकारने कोणतीही सुरक्षा दिली नाही. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचारही केले नाहीत. पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुंबीयांचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार काढून घेतला. मृत पीडितेला सन्मानही दिला नाही”.

https://twitter.com/priyankagandhi/status/1311142728902651905

“तुम्ही गुन्हा रोखला नाहीत तर गुन्हेगाराप्रमाणे वागलात. अत्याचार रोखले नाहीत तर एका निरागस मुलगी आणि तिच्या कुटुंबावर दुप्पट अत्याचार केले. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या कार्यकाळात न्याय नाही तर फक्त अन्याय सुरु आहे”.

https://twitter.com/priyankagandhi/status/1311142730525937666

आझाद समाज पार्टीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद दलित पीडितेला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेले होते. त्यांनी पीडितेला चांगले उपचार दिले जात नसल्याचा आरोप केला होता.

तर दुसरीकडे बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ट्विटर वरुन प्रतिक्रिया दिली...

'उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका दलित मुलीला आधी वाईट पद्धतीनं मारण्यात आलं. मग तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. ही अतिशय लाजिरवाणी आणि अति-निंदनीय गोष्ट आहे. अन्य समाजाच्या मुली-बहिणीही आता उत्तर प्रदेशात सुरक्षित नाहीत. सरकारनं याकडे लक्ष द्यावं अशी बसपाची मागणी आहे."

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाथरस घटनेचा निषेध केला असून हाथरस येथील खैरलांजी हत्याकांडला 14 वर्ष पूर्ण झाले असताना ही घटना घडली आहे. 14 वर्षानंतरही खैरलांजी हत्याकांड प्रकरणात न्याय मिळाला नाही. असं म्हणत दलित अत्याचार आणि न्याय या बाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. उत्तरप्रदेश मधील हाथरस घटनेचा त्यांनी ट्विटर वर व्हिडीओ शेअर करुन निषेध व्यक्त केला आहे.

https://twitter.com/RamdasAthawale/status/1311015918978453505

Similar News