RSS ने भगव्याच्या जागी तिरंगा फडकवला

Update: 2022-08-13 08:40 GMT

52 वर्ष संघाच्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणाऱ्या आरएसएसने संघ मुख्यालयात तिरंगा फडकवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा ध्वजाचा आदर करत नाही. अशी टीका सातत्याने होत असते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिम हाती घेतली आहे. त्यानंतर देशभरात लोक आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आरएसएसने तिरंगा झेंडा फडकवला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शनिवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरचा भगव्या रंगाचा प्रोफाइल फोटो काढून त्या जागी राष्ट्रध्वज लावला. शनिवारी, आरएसएसने आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा राष्ट्रध्वज फडकावतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया शेअर केला आहे. यामध्ये ते "हर घर तिरंगा" मोहिमेला पाठिंबा दर्शवताना दिसत आहे. सुरुवातीच्या काळात आरएसएसचा भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्याला विरोध होता. मात्र, मोदींच्या या मोहिमेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेल्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या महिन्याच्या सुरुवातीला, RSS च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 52 वर्ष नागपूरच्या मुख्यालयात झेंडा न फडकवणारा संघ राष्ट्रध्वज सोशल मीडियावर लावणार का? असा सवाल उपस्थित केला होता.

Tags:    

Similar News