केंद्र सरकारने नव्याने अर्थसंकल्प मांडावा : चिदंबरम

Update: 2020-05-27 13:08 GMT

कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. पण आता मोदी सरकारला या गर्तेमधून बाहेर पडण्यासाठी कर्ज आणि चलनीकरण म्हणजेच नोटांची छपाई वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.

सरकारने 20 लाख कोटींचे जे पॅकेज जाहीर केले आहे ते मुळात 1 लाख 86 हजार 650 कोटी रुपये म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 0.91 टक्के एवढेच आहे अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारने 1 फेब्रुवारी रोजी ज्या गोष्टी गृहीत धरुन अर्थसंकल्प मांडला आहे त्या आता कालसुंसगत नाहीत.

त्यामुळे १ जून रोजी सरकारने नव्याने अर्थसंकल्प मांडावा अशी मागणी पी चिदंबरम यांनी केली आहे. आधीच आर्थिक मंदीमुळे संकट आलेले असताना आता लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खोल गर्तेत अडकली आहे. त्यासाठी सरकारने नोटांची छपाई करुन चलनीकरण वाढवण्याची मागणी चिदंबरम यांनी केली आहे. कोट्यवधी स्थलांतरीत मजुंराचा रोजगार गेला आहे. त्यामुळे मोदी सरकारला ही शेवटची संधी असल्याचा इशारा चिदंबरम यांनी दिला आहे.

Similar News