जळगाव जिल्ह्यात 144 नवे रुग्ण

Update: 2020-07-01 01:29 GMT

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नवीन 144 रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 244 झाली आहे.

जिल्ह्यातील मृत्यूदर हा देशात सर्वाधिक असल्याने इथे गेल्या आठवड्यात केंद्रीय पथकानेही पाहणी केली होती. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

रोज किमान दीडशे कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडत आहे. दरम्यान जिल्ह्यात एका दिवसात 10 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 3 हजार 582 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.

तर 2 हजार 111 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सद्या 1228 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 178 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेची अतिरिक्त आरोग्य टीम काम करत आहे. दरम्यान रुग्णसंख्या वाढतच असल्याने आता खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Similar News