"ह्या लांडगा काकाच्या नादी लागू नका," गोपीचंद पडळकर यांचे धनगर समाजाला आवाहन

Update: 2023-09-08 09:17 GMT

सोलापूरमध्ये धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून निषेध केला. त्यावरून गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला आवाहन केले आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, मल्हारी मार्तंडाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा ‘भंडारा’ हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतिक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणे हे अतिशय अयोग्य आहे‌ आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांवर उधळला असेल तर मी विखे पाटलांना विनंती करतो की, तो खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून कपाळाला लावावा.

तसेच पडळकर पुढे म्हणाले, मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की, ह्या लांडगा काकाच्या नादाला लागू नका. आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या मुंबई उच्च न्यायालायात लढतो आहोत आणि त्याबाबत वेळोवेळी जे मागितले ते सर्व सहकार्य देवेंद्र फडणवीस यांच्या कडून आपल्याला मिळत आहे. आम्हाला खात्री आहे की, मल्हारी मार्तंड खंडोबा नक्कीच आपल्याला यश देईल.

Tags:    

Similar News