मुंबई सुपरफास्ट; कुलाबा-सिप्झ मेट्रोला अखेर मुहूर्त

मुंबईत उड्डाणपूल आणि मेट्रो सेवांचे जाळे झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबईकारांना अजून एक आनंदाची बातमी आहे. लवकरच डिसेंबर 2023 पर्यंत, जनतेसाठी सीप्झ आणि कुलाब दरम्यान मेट्रो सेवा उपलब्ध असेल. मुंबई मेट्रो रेल कंपनी लिमिटेड (MMRC) नुसार या मार्गावरील 26 पैकी 21 स्थानके 90% पूर्ण झाली आहेत, १८ स्थानकांवर इतर उपकरण लावण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.

Update: 2023-03-24 04:46 GMT

एमआयडीसी स्टेशनचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर विधानभवन स्टेशनचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२१ मध्ये मार्गावर रुळ बसवण्याचे काम सुरू होईल. आतापर्यंत ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गिका आहे . एमएमआरसीच्या उद्दिष्टानुसार आरेमधील कारशेड शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे इतकेचं आहे. कारशेडने आतापर्यंत 53.8 टक्के काम पूर्ण केले आहे. या वर्षीचे काम पूर्ण होऊ कारशेडचं काम पूर्ण होऊ शकत नसल्याने एमएमआरसीएलने सीप्झ ते बीकेसीपर्यंत ९ रेकसह मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिसेंबर २०२३मध्ये मेट्रो ३चा पहिला टप्पा सुरु करण्याआधी प्रत्यक्ष वेगाने चाचण्या करण्यात येणार आहे. सीप्झ ते बीकेसी नॉर्थ पर्यंत, या चाचण्या जवळपास 10,000 किमी अंतरावर चालवल्या जातील. चाचण्यांचा दुसरा टप्पा जुलै 2024 पर्यंत पूर्ण होईल. सध्या, मेट्रो 3 चे काम सध्या प्रगती पाठवणार असून, या मार्गाचे 79.8% काम पूर्ण झाले आहे.

 कुलाबा ते सीप्झ स्थानके अशी आहेत.

कफ परेड

विधानभवन

चर्चगेट

हुतात्मा चौक

सीएसएमटी

कालबादेवी

गिरगाव

ग्रँट रोड

मुंबई सेंट्रल

महालक्ष्मी

सायन्स म्युझियम

आचार्य अत्रे चौक

वरळी

सिद्धिविनायक

दादर

शीतला देवी

धारावी

बीकेसी

विद्यानगरी

सांताक्रुझ

सीएसएमआयए (टी १)

सहार रोड

सीएसएमआय (टी २)

मरोळ नाका

एमआईडीसी

सीप्झ

Tags:    

Similar News