सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण!

Update: 2020-08-12 10:00 GMT

गेल्या दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव प्रति तोळा 58 हजार 500 वर पोहोचले होते. तर चांदी 75 हजार रुपयांवर पोहोचली होती. आज तोच भाव सोन्याचा प्रति तोळा 53 हजार 500 तर चांदी प्रति किलो 64 हजारापर्यंत खाली आली आहे.

सोने चांदी भावाच्या बाबतीत पहिल्यांदाच इतका इतका भाव खाली आल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सोन्याच्या भावात मोठी तेजी-मंदी जाणवली. अमेरिका चीन युद्धजन्य परिस्थिती, जागतिक मंदी, शेअर मार्केट घसरण या पार्श्वभूमी मुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार पाहायला मिळाला. या चढउतारामुळे सोन्यासारख्या धातुकडे गुंतवणूक वाढीचा कल पाहता सोन्याचे भावात चढ उतार राहिला.

सोन्याच्या भावात चढ उतारास सट्टेबाजी ही कारणीभूत आहे. गेल्या काही दिवसात जागतिक बाजारात मोठे बदल झाले. यामुळेही सोने चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचं बोललं जातं आहे. सोने मार्केट मध्ये काही दिवस भावात चढ उतार कायम राहणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी सर्वच गुंतवणूक सोन्यात न करता फक्त 20 ते 30 टक्के च गुंतवणूक करावी अस सोने जाणकारांचे म्हणणं आहे.

Similar News