जगात कोरोना रुग्णांची संख्या घटतेय....

Update: 2020-04-08 01:01 GMT

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूविरोधातल्या लढ्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहे. दर दिवसाला आता जगभरात कोरोनामुळे वाढणारी रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. सध्या जगभरातील रुग्णांची संख्या १२ लाख ८२ हजार ९३१ झाली आहे.

मात्र कोरोना बळींच्या संख्येत जगभरात गेल्या २४ तासात वाढ होऊन ती संख्या ७२ हजार ७७६वर पोहोचली आहे. जगभरातील कोरोनाबाधीत देशांमध्ये गेल्या २४ तासात ५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. युरोपात २४ तासात सुमारे ३१ हजार नवीन रुग्ण आढळले असले तरी ही संख्या ९ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर अमेरिकेत ३१ हजार ६५० नवीन रुग्ण आढळले असले तरी यात १७ टक्क्यांची घट झाली आहे.

अमेरिकेत सध्या कोरोना रुग्णांचा आकडा ३ लाख ८४ हजार २४२ वरु पोहोचला आहे. स्पेनमध्य तर नवीन रुग्ण घटण्याचे प्रमाण २९ टक्के आहे. इटलीमध्ये देखील ४ हजार ३१६ नवीन रुग्ण आढळले असले तरी हे प्रमाण १७ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर ज्या चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला त्या चीनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे फक्त ६६ नवीन रुग्ण आढळले असून हे प्रमाणही १२ टक्क्यांनी कमी झाले आहे.

Similar News