पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर

Update: 2020-12-27 01:30 GMT

राज्यातील अनेक युवकांचे पोलीस होण्याचे स्वप्न असते आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करण्याची त्यांची तयारी असते. पण ही तयारी नेमकी कशी करावी याची माहिती अनेक विद्यार्थ्यांना मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अडचणींचा सामना कायम करावा लागतोय.

यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत कणवकवलीमध्ये पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी कणकवली कॉलेज येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते.

यावेळी संदेश सावंत यांनी एमपीएसच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची पुस्तके मोफत दिली. तर नितेश राणे यांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स शूज देण्याची घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती होईपर्यंत हे प्रशिक्षण शिबिर सुरू राहणार आहे. यामध्ये मुंबईहून पण काही तज्ज्ञ येऊन विद्यार्थअयांना मार्गदर्शन करणार आहेत.

Tags:    

Similar News