देश आर्थिक मंदीच्या दिशेने, सरकारने सुडाचं राजकारण बाजूला ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा : मनमोहन सिंह

Update: 2019-09-01 08:51 GMT

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था 5 टक्क्यावर येणं, हे दर्शवतं आहे की, देशाची अर्थव्यवस्था मोठ्या मंदीत जात आहे. खरंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यापेक्षा अधिक वेगानं वाढण्याची क्षमता असून मोदी सरकारचा प्रत्येक क्षेत्रातील गोंधळ हा या मंदीसाठी कारणीभूत आहे.

अर्थ तज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंह यांनी उत्पादन क्षेत्रातील वाढ 0.6 वर थांबली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, आपली अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि घाईघाईनं लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GSTमधून सावरली नाहीये.

मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे की, भारत सततच्या आर्थिक मंदीला झेलू शकत नाही. सरकारनं सुडाचं राजकारण बाजूला ठेवून तज्ज्ञांची मतं विचारात घेऊन आपल्याला अर्थव्यवस्थेला नवीन मार्गाने घेऊन जावं. जी निर्माण केलेल्या संकटात फसली आहे.

दरम्यान तिसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 5 टक्क्यावर येऊन ठेपला असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या मंते जगात आर्थिक मंदी असून इतर राष्ट्राच्या तुलनेत देशाचा आर्थिक विकास दर चांगला आहे.

Full View

Similar News