धक्कादायक : वनरक्षक महिला कर्मचाऱ्यावर माजी सरपंचाचा हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Update: 2022-01-20 07:08 GMT

ऑन ड्युटी असलेल्या महिला वनरक्षकावर एका व्यक्तीने हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील पळसवडे येथे घडला आहे. पळसवडे येथील माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या ह्या व्हायरल व्हिडिओ मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये मारहाण झालेली महिला कर्मचारी तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची आहे.

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. संबंधित व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली असून कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असे देखील स्पष्ट केले आहे. तसेच असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.


घटना नेमकी काय?

सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा हा प्रकार घडला आहेय आपल्याला न विचारता वनमजूर दुसरीकडे का नेले, असा सवाल रामचंद्र जानकर यांनी विचारला होता. तसेच याच कारणातून चिडून वनसमितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Full View

Tags:    

Similar News