विवाहसमारंभात जेवलेल्या 50 लोकांना अन्नातून विषबाधा

Update: 2021-11-14 03:21 GMT

शिवमोगा // कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहसमारंभात जेवलेल्या 50 लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. जेवनानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. शिवमोगा जिल्ह्यातील अलाड हल्ली गावात ही घटना आहे.

अलाड हल्ली गावात एका विवाह समारंभात तब्बल 500 लोकांनी जेवन केले. मात्र, यातील 50 जणांना जेवनानंतर त्रास जाणवू लागला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, रुग्णांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. श्रीधर एस यांनी दिली.

दरम्यान , घटनेची माहिती मिळताच शिवमोगा जिल्हा परिषदेचे सीईओ एमएल वैशाली यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. सोबतच लग्नात बनवण्यात आलेल्या जेवनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. संबंधित रुग्णांना जेवणातून किंवा पाण्यातून विषबाधा झाली असावी असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातूनही असाच प्रकार समोर आला होता. तेराव्याच्या जेवनातून 49 लोकांना विषबाधा झाली होती. बालोद जिल्ह्यातल्या बोहारडी या गावात ही घटना घडली आहे. जेवनानंतर संबंधित लोकांना चकरा येणे, अशक्तपणा, पोटात दुखणे अशी लक्षणे दिसून आली होती.

Tags:    

Similar News