शिंदे समर्थकांकडून ठाण्यात फलकबाजी...

Update: 2023-02-22 11:49 GMT

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर बुधवारी ठाणे शहरात शिंदे समर्थकांनी फलकबाजी करत, ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणुक आयोगाने बुधवारी अधिकृत शिवसेना असल्याचे जाहीर केले आणि शिंदे गटाला शिवसेना या नावासह निवडणूक चिन्ह सुद्धा बहाल केले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटांमध्ये वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाण्यात फलकबाजी सुरु केली आहे. या फलकामध्ये बघितला आनंदा...आपल्या एकनाथाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण सोडविला आहे. असा मजकूर त्यामध्ये लिहीण्यात आला आहे.

या मजकूराशेजारीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. तर एकनाथ शिंदे यांना आकाशातून दैवत धनुष्यबाण देत असल्याचे चित्र आहे. हे फलक ठाणे शहारातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये विविध वादाने टोक गाठले आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे तिथे काय निर्णय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Tags:    

Similar News