मुंबईत ६० मजली इमारतीमध्ये आग

Update: 2021-10-22 07:48 GMT

मुंबईत एका ६० मजल्यांच्या इमारतीच्या एका मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. लालबागजवळच्या भारत माता थिएटरमोसर असलेल्या अविघ्न पार्क टॉवरमध्ये आग लागली आहे. परिसरात आगीच्या धुराचे मोठे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. इमारतीच्या 25 व्या मजल्यावर आग पसरली आहे. दरम्यान या इमारतीच्या त्याच मजल्यावरुन जीव वाचवताना एक व्यक्ती हात सुटल्याने खाली कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Full View

Tags:    

Similar News