उरणमधल्या ओएनजीसी प्लांटला आग

Update: 2019-09-03 05:33 GMT

नवी मुंबईतील उरणमधील ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) च्या कोल्ड स्टोरेजला आज सकाळच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. द्रव पदार्थाच्या गळतीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ओएनजीसी फायर सर्व्हिसेस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आता आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या आगीमुळे तेल प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही असं ओएनजीसीकडून सांगण्यात आलंय. तेल प्रक्रिया गॅस हाजिरा प्लांटकडे वळवण्यात आली आहे.

Similar News