अखेर मुख्यमंत्री बिनविरोध आमदार झाले!

Update: 2020-05-14 12:28 GMT

मोठ्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांना आमदारकी देखील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर मिळाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव अधिकृतरित्या मुख्यमंत्री झाले आहेत. या संदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट केलं असून त्यांनी छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली याबाबत आनंद होतोय. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बिनविरोध आमदार झाल्याबाबत अभिनंदन केलं आहे.

आमदार म्हणून विधान परिषदेवर मा. उद्धवजी ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली याबाबत आनंद होतोय. महाराष्ट्र सरकार रयतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार याचा मला विश्वास आहे.

Similar News