विधानसभेच्या तोंडावर शेतकरी का झाले आहेत आक्रमक पाहा...

Update: 2019-10-02 16:52 GMT

शेतकरी प्रश्न निवडणुकीत मुख्य मुद्दे म्हणून केंद्रस्थानी आणण्यासाठी 2 ऑक्टोबर पासून राज्यभर किसान सभा व शेतकरी संघटनांनी ‘मी शेतकरी’ हे अभियान सुरु केलं आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी कायदा व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या मागण्या या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी गावोगाव हे अभियान राबवलं जाणार आहे.

‘मी शेतकरी’ अभियाना अंतर्गत गावाच्या पारावर, चावडीवर शेतकरी निवडणूक काळात राज्यभर गावोगाव ठिय्या देणार असून यातून निवडणूकीत शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी आणले जातील असं या आंदोलनातील शेतकऱ्यांचं मत आहे.

या अभियानातील शेतकरी प्रचारासाठी गावात येणाऱ्या शेतकरी विरोधी राजकीय पक्षांना शेतकरी प्रश्नांबाबत जाब विचारणार आहेत. सभा घेणाऱ्या पक्षांना शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावाबाबत भूमिका मांडण्यास भाग पडणार आहे.

आज 2 ऑक्टोबर ला या अभियानाची सुरुवात झाली. अकोले जि. अहमदनगर येथे भव्य शेतकरी रॅली काढून या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये पारावर ठिय्या मांडून शेतकऱ्यांनी या अभियानाला आज सुरुवात झाली.

सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, अमरावतीसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना आज या अभियाना अंतर्गत निवेदन देण्यात आली आहेत.

Full View

Similar News