धक्कादायक : बनावट RTPCR रिपोर्ट तयार करणारी टोळी अटकेत

कोरोनाच्या संकट काळात औषधांचा काळा बाजार होत आहे. पण संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे.

Update: 2021-04-17 05:22 GMT

एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही गैरप्रकार देखील घडत असल्याचं समोर आले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये उघड झाला आहे. बनावट आरटीपीसीआर चाचणी अहवाल तयार करुन देणाऱ्या दोन लॅब मालकांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. देविदास घुले(44) व मोहम्मद वसीम(21) अशी या दोघा लॅब मालकांची नावे आहेत. त्यांनी गेल्या आठवडयात रबाळे एमआयडीसीतील प्रविण इंडस्ट्रीज कंपनीतील 133 कामगारांना त्यांचे कोव्हीड रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे बनावट अहवाल तयार करुन दिले होते.

कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांने आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याच्या तसेच कोविडचे अहवाल निगेटीव्ह असलेल्या कामगारांनाच कामावर ठेवण्याबाबतचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे रबाळे एमआयडीसीतील प्रविण इंडस्ट्रीजने 8 एप्रिल रोजी आपल्या कंपनीतील 133 कामगारांसाठी कोविड तपासणी शिबिराची व्यवस्था केली होती.

यावेळी ठाणे येथील मिडटाउन डायग्नोस्टिक्स आणि कल्याणमधील परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजी यांनी संयुक्तपणे सर्व कामगारांचे स्वॅबचे नमुने गोळा केले होते. परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजीचा थायरोकेयरशी संबंध असल्याने या कामगारांचे सर्व नमुने तपासणीसाठी थायरोकेअरकडे पाठविणे आवश्यक होते. मात्र,या दोन्ही लॅब चालकांनी सदर कामगारांच्या स्वॅबचे नमुने थायरोकेअरला न पाठविता थायरोकेअरच्या लेटर हेडवर स्वत: बनावट अहवाल तयार करुन प्रत्येक कामगारांना कोवीडचे निगेटीव्ह अहवाल दिले.

Tags:    

Similar News