भाजप - फेसबुक संबंध, फेसबुकचे स्पष्टीकरण

Update: 2020-08-17 09:59 GMT

नरेंद्र मोदी (narendra modi) सरकारची नाराजी नको म्हणून फेसबुकने (facebook) भाजपच्या नेत्यांच्या प्रक्षोभक पोस्ट न हटवता त्याकडे दुर्लक्ष केले, असे वृत्त अमेरिकेच्या The Wall Street Journal ने दिल्यानंतर भारतात खळबळ उडाली आहे. पण आता यावर फेसबुकने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. “हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट काढून टाकण्याचे फेसबुकचे जागतिक धोरण आहे. मग तो कोणताही पक्ष असो किंवा कोणतीही व्यक्ती असली तरी आमचे धोरण सारखेच असते. या धोरणात आणखी सुधारणेची गरज आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत. तसंच आमचे धोऱण अचूक असावे यासाठी सातत्याने आम्ही परीक्षणही करत आहोत“ असेही फेसबुकने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा..

Covid19: शरद पवारांच्या कोव्हिड टेस्ट वर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया….

“जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या”

भाजप फेसबुकच्या संबंधांची संसदीय समितीमार्फत चौकशी करा : काँग्रेस

टी.राजा सिंह या भाजप आमदाराच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट न हटवण्यासाठी फेसबुकच्या भारतातील आखी दास या महिला अधिकाऱ्याने विरोध केला होता, असे वृत्त The Wall Street Journal ने दिले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला फेसबुकने मदत केल्याची माहिती फेसबुकच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी दिल्याची माहितीही या वृत्तात देण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसने या प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Similar News