2000 Note : ४ दिवस उरले २००० हजार रूपयांच्या नोटा बदलून घ्या

Update: 2023-09-27 08:51 GMT

सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. २ हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी आता फक्त शेवटचे ४ दिवस राहिले आहेत. रिजर्व बँकेनं १९ मे २०२३ रोजी २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन ठरवून देण्यात आली आहे.

रिजर्व बँकेच्या माहितीनुसार ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.32 लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच २ हजार रूपयांच्या चलनात असलेल्या नोटांपैकी ९३ टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. २ हजार रूपयांच्या फक्त ७ टक्के नोटा या बँकांमध्ये अजूनही जमा व्हायच्या आहेत.

रिजर्व बँकेनं नोटा बदलणे किंवा बँकेत जमा करण्यासाठीची ठरवून दिलेली ३० सप्टेंबरची डेडलाईन निघून गेली तरी काळजी करण्याचं कारण नाही. खासगी किंवा सरकारी बँकांमध्ये २००० हजार रूपयांच्या नोटा बदलता किंवा जमा करता येणार नाही. मात्र, रिजर्व बँकेच्या कार्यालयात जाऊन या नोटा बदलता येऊ शकतात. रिजर्व बँकेच्या देशभरातील १९ क्षेत्रीय कार्यालयात जाऊन २००० हजार रूपयांच्या नोटा बदलता येऊ शकतात. मात्र, या नोटा बदलण्यासाठी फक्त विदेशी नागरिकांना परवानगी असू शकते. रिजर्व बँक २००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठीची मुदत वाढवूही शकते, अशी माहिती Bloomberg Quint या वाहिनीनं दिलीय.

नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० रूपयांची नवी नोट चलनात आली होती. मात्र, मे २०२३ मध्ये हीच नोट चलनातून बंद करण्याची घोषणा रिजर्व बँकेनं केली. रिजर्व बँकेनं ज्या उद्देशानं २००० रूपयांची नवी नोट चलनात आणली होती, तो उद्देश पूर्ण झाल्याचं रिजर्व बँकेनं मे महिन्यात सांगितलं होतं.

Tags:    

Similar News