खडसेंचं आज शक्ती प्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करणार...

Update: 2019-10-01 04:08 GMT

भाजप ने अद्याप पर्यंत कोणत्याही उमेदवाराला एबी फॉर्मचं वाटप केलेलं नाही किंवा कोणताही अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. तरीही आज भाजपचे नेते एकनाथ खडसे पक्षाचा अधिकृत अर्ज (एबी फॉर्म ) मिळालेला नसतानाही मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

खडसेंचं मंत्री पद गेल्यापासून खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे.

मध्यंतरी त्यांनी ‘मला आता यापुढे कोणतेही पद घेण्याची इच्छा नाही,’ असं वक्तव्य केले होते. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र तसे काही झाली नाही. भाजपची राजकारणातील घोडदौड पाहून अनेक लोक आता भाजपकडे येत आहेत. अशा नवीन येणार्‍या लोकांना संधी दिल्याने पक्षाचे भविष्यकालिन महत्त्व वाढते. त्यामुळे आपली यापुढे कोणतेही पद घेण्याची इच्छा नाही, असे खडसे यांनी सांगितले.

राजकारणात कोणतंही पद घेण्याची इच्छा नाही. असं म्हणणाऱ्या खडसे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं जाहीर करुन पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते आहे. विशेष म्हणजे खडसे यांचं तिकिट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे खडसेंनी अधिकृत उमेदवारी जाहीर न होताच आज अर्ज दाखल करुन पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

Similar News