सिना कोळेगाव प्रकल्पातील स्थानिक मच्छीमारांच्या मनधरणीचे पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न

Update: 2021-09-03 14:49 GMT

उस्मानाबाद जिल्ह्यातील सिना कोळेगाव प्रकल्पात स्थानिक मच्छीमारांना मत्सव्यवसाय परवाना मिळावा या मागणीसाठी साह्यक आयुक्त कार्यालयात सुरू असलेले आंदोलन थांबविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड प्रयत्न करत असुन मत्स विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र अतुल खोपसे-पाटील हे मात्र आंदोलनावर ठाम असुन जोपर्यंत साह्यक आयुक्त वाघमोडे स्वतः येऊन मच्छिमारीचा परवाना देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असे त्यांनी सांगितले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कोळ धरणात गेल्या आहेत, त्यामुळे त्यांना शेती करता येत नाही, त्यांनी या धरणात मासेमारी सुरू केली तर शासनाकडून त्यांना परवाना मिळत नाही त्यामुळे स्थानिक शेतकरी मासेमारी करणाऱ्या नागरिकांना शासन नियमानुसार परवाना मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान संबंधित प्रशासनाकडून परप्रांतीय मासेमारांना कमी पैशात परवाना दिला जात असून परप्रांतीयांना मासेमारी करण्याचा परवाना देऊ नये असा शासनाचा नियम असताना देखील परप्रांतीय परवाना कसा दिला जातो असा सवाल अतुल खोपसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे स्थानिकांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

Tags:    

Similar News