राष्ट्रवादीच्या एका उमेदवारामुळे दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद

Update: 2019-10-06 05:55 GMT

राज्यात तांत्रित कारणांमुळे उमेदवारांचे अर्ज बाद होण्याच्या अनेक घटना काल घडल्या. पण कुर्ल्यामध्ये एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला.

राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा अर्ज राष्ट्रवादीच्याच उमेदवारामुळे बाद झाला आहे.

कुर्ला मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जोत्स्ना जाधव आणि मिलिंद कांबळे हे दोन उमेदवार इच्छुक होते. पक्षाने दोघांनाही एबी फॉर्म दिले. जोत्स्ना जाधव यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात गेल्या.

मात्र त्याआधीच मिलिंद कांबळे यांनी राष्ट्रवादीकडून आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे ज्योत्स्ना जाधव यांचा अर्ज बाद ठरवला गेला.

Similar News