संचारबंदी कायदा मोडल्याप्रकरणी भाजप आ. सुरेश धसांवर गुन्हा

Update: 2020-04-03 14:23 GMT

राज्यात संचारबंदी लागू असताना जिल्हा सोडून परजिल्ह्यात जाणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर बीडच्या आष्टी पोलिसात जिल्हा प्रशासन व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. यादरम्यान संचारबंदीही लागू आहे. याशिवाय जिल्ह्या-जिल्ह्यांच्या सिमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना देखील सर्वच आदेशांचे उल्लंघन करुन भाजपचे आमदार सुरेश धस हे २ एप्रिल रोजी मध्यरात्री आष्टी येथून अहमदनगर जिल्ह्यातील खेडकडे गेले होते.

त्याठिकाणी जाऊन त्यांनी ऊसतोड कामगारांशी चर्चा केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या व शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोना. प्रशांत क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात कलम 188, 269, 270 भादंवि सहकलम 51 (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar News