महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच करावा लागला विनयभंगाचा सामना..

Update: 2023-01-20 07:31 GMT

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असं असताना काल एक धक्कादायक प्रकार घडला. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनाच मध्यरात्री शहराच्या रस्त्यांवर विनयभंगाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले आहे. महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेल्या स्वाती मालीवाल यांनाच विनयभंगाच्या प्रसंगाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण विरोध करणाऱ्या मालीवाल यांना संबंधित मोटार चालकाने काही अंतरापर्यंत फरफडत नेण्याचा गंभीर घटना घडली आहे.

नक्की काय घडलं?

स्वाती मालीवाल आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारी मध्यरात्रीनंतर पावणेतीन च्या सुमारास दिल्लीच्या रस्त्यावर महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्या एम्स रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन वर उभ्या होत्या. त्या ठिकाणी उभ्या असताना समोरून एक पांढऱ्या रंगाची मोटार त्यांच्याजवळ आली. त्यात असलेला मोटार चालक पूर्णतः नशेत होता. त्यांनी मालीवाल यांना गाडीत बसण्याचा आग्रह केला. त्यांनी नकार दिल्यानंतर मोटार चालक त्या ठिकाणहून निघून गेला पण काही अंतर पुढे गेल्यानंतर तो पुन्हा त्यांच्याजवळ आला. त्यानंतर तो त्यांच्याशी असंभ्य भाषेत बोलू लागला व पुन्हा त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह धरू लागला. इतका संताप जनक प्रकार घडल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल या त्याला खडसावण्यासाठी त्याच्या गाडीजवळ गेल्या, त्याच्याशी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता चालकाने आपल्या बाजूच्या खिडकीची काच बंद केली त्यामुळे मालीवाल यांचा हात खिडकीत अडकला. यानंतर गाडी चालकाने गाडी सुरू केली आणि सुमारे दहा ते वीस मीटर अंतरापर्यंत त्यांना फरपटत नेले.

तर अशा प्रकारचा हा धक्कादायक प्रकार स्वतः दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या स्वाती मालीवाल यांच्यासोबतच घडला आहे. उद्या देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत गंभीर होत चालला आहे. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम घेत दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या 46 वर्षीय हरिश्चंद्र याला अटक केली आहे. आता या सगळ्या प्रकाराबाबत दिल्ली महिला आयोगाने व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनीही दखल घेऊन दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

Tags:    

Similar News