डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील माहितीपट 'व्हाईट कोट लिजेंड्स' प्रदर्शित

Update: 2023-07-24 15:38 GMT

जेष्ठ नेत्रशल्यविशारद, पद्मश्री, डॉ. तात्याराव लहाने यांचा जीवनप्रवास आता माहितीपटाद्वारे लोकांसमोर आणण्यात आलाय. डॉकफ्लिक आणि मॅनकाईंड कंपनीनं ‘'व्हाईट कोट लिजेंड्स'’ या माहितीपटाची निर्मिती केलीय. २२ जुलै रोजी सायंकाळी वांद्रे इथल्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये या माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात आलं होतं.

Full View

समाजासाठी झटणाऱ्या ५० डॉक्टरांवर माहितीपट बनवण्यात आले आहेत. त्या ५० डॉक्टर्समध्ये डॉ. तात्याराव लहाने यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. लहाने यांची पत्नी सुलोचना व कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यासह मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री किशोरी शहाणे, अभिनेता अविनाश नारकर आणि पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर उपस्थित होत्या.

गेली ३० वर्ष डॉ. तात्याराव लहानेच्या सहकारी राहिलेल्या डॉक्टर रागिनी पारेख या सुध्दा उपस्थित होत्या, मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना त्या म्हणाल्या की, या माहितीपटाच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा मिळावी हाच या माहितीपटामागचा हेतू आहे.

डॉ. तात्याराव लहाने मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले की, मला फार आनंद वाटतो की 'डॉकफ्लिक आणि मॅनकाईंड कंपनीने "व्हाईट कोट लिजेंड्स" ही डॅाक्युमेंट्री केली, या माध्यमातून पुढे काम करण्याची उर्जा मिळेल असं मतं डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.


Tags:    

Similar News