डॉ.दाभोळकरांचा जन्मदिन आंतरजातीय विवाहाने साजरा

Update: 2019-11-02 15:49 GMT

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिन 'विवेक जागर दिन' म्हणून कोल्हापूर मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह लावून डॉ. दाभोलकरांना जन्मदिनाचे औचित्य साधत अनोखे अभिवादन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा आयसीयू वर !

कुणाल व करिष्मा या दोघांनी डॉ. दाभोळकर यांच्या जन्मदिनी आंतरजातीय विवाह करून आपल्या सहजीवनाची सुरुवात केली. कोल्हापुरातील पुरोगामी संघटनांकडून शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सुरुवातीला कुणाल व करिष्मा यांनी महात्मा ज्योतीराव फुले व डॉ.दाभोळकर यांच्या प्रतिमांना नमन केले. सुजाता म्हेत्रे यांनी सत्यशोधकी सप्तपदी म्हणून हा विवाह लावला. एकमेकांचा आदर, प्रेम, विश्वास, समानता, त्याग, मानवता व विवेक या सप्तपदीची शपथ घेऊन दोघेही विवाहबद्ध झाले.

शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद – देवेंद्र फडणवीस

बसव विचार केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र आदी संघटना सहभागी होत्या.

यावेळी डॉ.मेघा पानसरे, तनुजा शिपुरकर, कॉ.दिलीप पवार, उदय नारकर, अतुल दिघे, राजशेखर तंबाखे, नाट्य दिग्दर्शक सुनील माने, सुनील स्वामी, संजय रेंदाळकर, निहाल शिपुरकर, स्वाती कोरे, निशांत शिंदे, उमेश सूर्यवंशी, शिवाजी माळी आदी उपस्थित होते.

Similar News